जाणून घ्या ‘ अर्णब गोस्वामी ‘ च्या अटकेमागचे कारण !

0
262

सकाळी ६ च्या सुमारास रिपब्लिक मीडियाचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना ही अटक करण्यात आलेली आहे. देशभरात काही प्रमाणात या अटकेस समर्थन त्याचबरोबर विरोधही होताना दिसत आहे. भाजपाने हया अटकेचा निषेध करत हा तर पत्रकारितेवरचा हल्ला व आणीबाणीच्या काळातील दिवस अशी टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here