दर महिन्यात एकदा पूर्ण चंद्रदर्शन होते त्यास आपण पौर्णिमा संबोधतो परंतू हया महिन्यात हे चंद्रदर्शन दोनदा होणार आहे, ही खगोल प्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. एकाच महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसल्यास त्यातील दुसऱ्या पूर्ण चंद्रास इंग्रजीत ‘ Blue moon ‘ ( ब्ल्यू मून ) संबोधले जाते. येत्या शनिवारी ३१ आॅक्टो. ला रात्री ८ वाजून १९ मि वाजता हया ‘ ब्ल्यू मून ‘ ( Blue Moon ) चे दर्शन होणार आहे. उगवणारा चंद्र हा लालसर असतो परंतू तो क्षितिजापासून अधिक उंचीवर पोहचतो तेव्हा पृथ्वीवरील प्ररावर्तित प्रकाशामुळे पांढरा दिसतो यात करड्या छटा मिसळल्याने तो निळसर भासू लागतो.
अश्याप्रकारे ह्या शनिवारी ब्ल्यू मून दर्शन होणार आहे खगोल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असून खगोल प्रेमी ही संधी दवडणार नाहीत.

